February 27, 2021
स्पर्धा परिक्षेच्या विश्वात….!!

स्पर्धा परिक्षेच्या विश्वात….!!

एकनाथ पाटील ॲकडमी ठरतेंय ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधारवड –

साधारणपणे १५-२० वर्षा अगोदर नांदेडात शिक्षणाच्या पायाभूत सोयी-सुविधांची रेलचेल होती असे म्हणायला हरकत नाही कारण त्याकाळात आजूबाजूच्या तीन-चार जिल्हयातून खूप विद्यार्थी हे शिक्षणासाठी नांदेडात यायचे ….आणि पुढे जाऊन बरेच जण ईथेच स्थायिक व्हायचे असा त्या काळात एक तत्कालिन ट्रेंड झाला होता … पण या सगळ्या तरूण पिढीपुढे एक प्रश्‍न कायम असायचा तो म्हणजे शिक्षणा नंतर पुढे काय ….

आम्हाला आजही आठवते की , त्यावेळी पदवी नंतर खूप जण पुणे-हैदराबाद या ठिकाणी स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी जायचे पण त्यातही ज्यांचे आई-वडील हे शहरी भागातील असायचे किंवा सधन कुंटूबातील विद्यार्थ्यांना ते शक्य व्हायचे मग प्रश्‍न पडायचा तो ग्रामीण भागातून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना …. आता काय … नौकरी …व्यवसाय… कि पुढील शिक्षण….अथवा स्पर्धा परिक्षेच्या विश्वात स्वतःला झोकून द्यायचे ….निर्णय दिसायला सोपा असायचा पण त्याला पुढे नेणेही तितकेच अवघड असायचे कारण पुढे दिसायच्या त्या प्रचंड समस्या…..त्याला अनुसरत स्वतः स्पर्धा परिक्षांची तयारी केली असल्याने व त्या खूप अडचणीच्या माग्रावरून वाटचाल केल्यामुळे एकनाथ पाटील सरांनी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणीची माहीतीच नाहीतर चांगली जाणीव आहे …

नांदेडात स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे उमेदवार…. खेडय्यापाड्यातून येणारे हजारो विद्यार्थी…… मग ते पूर्व-मुख्य-मुलाखत अशा कोणत्याही टप्प्यावर असोत, त्यांच्यासाठी ‘स्पर्धा परीक्षांचे आशास्थान’ अशी ओळख एकनाथ पाटील ॲकडमी मागीद दशकभरांपासून नांदेडात केली आहे अगदी दहावी, बारावीपासून किंवा पदवी-पदविकेच्या वाटेवर असणारे विद्यार्थी, ज्यांना पुढील काळात प्रशासकीय सेवांची वाट चोखाळायची आहे, त्यांच्यासाठी एकनाथ पाटील सर परफेक्‍ट गाईड ठरतायेत .

पाल्यांच्या करिअरविषयी चिंतेत असणा-या पालकांना स्पर्धा परीक्षा समजून घ्यायला एकनाथ पाटील सर हे नांदेडकरांना उत्तम पर्याय आहेत. अलीकडे काही नवे बदल परीक्षा प्रक्रियेत झाले. परीक्षेच्या अभ्यासक्रमासह पॅटर्न बदलला. अभ्यासक्रम, प्रश्‍नांचे बदलते स्वरूप, बदलणारा पॅटर्न या सर्व गोष्टी लक्षात घेता, अभ्यासाची दिशा नेमकी कसी असावी, बदलांचे नेमके स्वरूप काय असावे, या बदलांना सामोरे जाण्यासाठी कशी तयारी केली पाहिजे, या सर्व बाबींचा दांडगा अभ्यास पाटील सरांना असल्याने त्यांच्या पुढ्यात बसल्यावर स्पर्धा परिक्षांचा एनसायक्लोपिडीया आपल्या पुढे उलगडत जातो …

आज आपल्या भागातील अनेक तरुण भारतीय प्रशासनाचे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात; पण त्या विद्यार्थाना अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी अपयशाला सामोरे जावे लागते. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते, मुलाखत कशी द्यावी यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतात. या पाश्र्वभूमीवर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा मार्ग सुकर करण्यासाठी व  स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठीचे तंत्र अवगत करण्यासाठी एकनाथ पाटील सर हे जिवाचे रान करत धडपड करतांना दिसतात ….. ग्रामीण भागातील कुठल्याही विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन त्यांना भेटलेनंतर आणखी धारदार होईल, हे मात्र निश्‍चित.

त्यांना भरभरून शुभेच्छा तसेच पुढील दमदार वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा …

आपला स्नेहाकिंत ,

मारोती सवंडकर , नांदेड …!

Share this page to Telegram

One thought on “स्पर्धा परिक्षेच्या विश्वात….!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot