March 9, 2021
#मिळवा …!! #आता विज बिलापासून मुक्तता …!!! #सोलार ऑन ग्रिड सिस्टीम बसवा आणि विज बिलापासून मुक्त व्हा …!

#मिळवा …!! #आता विज बिलापासून मुक्तता …!!! #सोलार ऑन ग्रिड सिस्टीम बसवा आणि विज बिलापासून मुक्त व्हा …!

सोलार ग्रिड काळाची गरज …1
सध्याचा काळ हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरण्याचा काळ आहे. अपारंपरिक पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांद्वारे निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे निसर्गाचे तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. सौर ऊर्जा हा एक त्यामधील महत्वाचा ऊर्जा स्रोत आहे जो आपण अगदी कमी किमतीमध्ये वापरण्यास चालू करू शकतो. आज आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत.
सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम कशी काम करते ?
सोलर सिस्टिम मध्ये Photo Voltaic सेल वापरले जातात. PV सेल हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवले जातात. या सेल वर प्रकाश पडला असता यामधून इलेक्ट्रॉन चे वहन चालू होते. म्हणजेच वीज निर्मितीला सुरुवात होते. ही वीज DC म्हणजेच डायरेक्ट करंट स्वरूपातील असते, जी बॅटरी मध्ये साठवली जाऊ शकते. ही वीज घरातील उपकरणांसाठी वापरण्यासाठी इन्व्हर्टर चा वापर करून AC म्हणजेच alternating current मध्ये रूपांतरित केली जाते.
 सोलर इलेक्ट्रिक सिस्टिम्स पुढील प्रकारांमधून वापरल्या जातात :
१) सोलर DC सिस्टिम्स :
या सिस्टिम्स मध्ये सोलर पॅनल द्वारे तयार झालेली वीज बॅटरी मध्ये साठवली जाते किंवा थेट DC उपकरणांसाठी वापरता येते. उदा. DC फॅन, DC LED ट्यूब, बल्ब, मोबाइलला चार्जिंग इ. दिवसभर तयार झालेली वीज बॅटरी मध्ये साठवून रात्री वापरता येऊ शकते. लहान घरासाठी तसेच जिथे फक्त प्रकाश किंवा फॅन हवा आहे तिथे ही सिस्टिम वापरली जाते. २ खोल्याना प्रकाश देण्यारी सिस्टिम ३५००/- पासून मिळू शकते.
 २) सोलर ऑफ ग्रीड ( off – grid ) सिस्टिम :
ज्या ठिकाणी विजेची उपलब्धता नसेल, परंतु घरगुती उपकरणे, TV , मिक्सर , फ्रिज, इ. वापरायची आहेत तेथे ही सिस्टिम वापरली जाते. या सिस्टिम मध्ये सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर, इन्व्हर्टर, बॅटरी वापरली जाते. किती क्षमतेचा पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी वापरायची हे उपकरणांच्या energy consumption , तसेच रोज कोणते उपकरण किती तास वापरायचे आहे यावर अवलंबून आहे. या सिस्टिम मध्ये दिवसभर बॅटरी सोलर द्वारे चार्जे करून रात्री वीज वापरू शकतो. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते. ही सिस्टिम ३०,०००/- पासून मिळू शकते.
 ३) सोलर हायब्रीड सिस्टिम:
ही सिस्टिम सोलर off grid सिस्टिम सारखीच असते परंतु यामध्ये सोलर वर तसेच MSEB सप्लाय वर चार्जिंग ची सुविधा असते. या सिस्टिम मध्ये सोलर इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम जिथे लोड शेडींग आहे तेथे वीज बिल काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने वापरल्या जातात. या सिस्टिम ला बॅटरी मेन्टेनन्स करण्याची तसेच ३ ते ५ वर्षानंतर बॅटरी बदलण्याची गरज असते. ही सिस्टिम ३५,०००/- पासून मिळू शकते.
 4) सोलर ग्रीड टाय ( GRID – Tie / ON GRID ) सिस्टिम :
या सोलर सिस्टिम मध्ये सोलर पॅनल आणि सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरला जातो. या सिस्टिम मध्ये दिवसभर तयार झालेल्या सोलर ऊर्जेचे रूपांतर अल्टर्नेट करंट मध्ये केले जाते आणि ही वीज MSEB कडे नेट मीटर द्वारे निर्यात केली जाते. रात्रीच्या वेळी ही वीज आयात केली जाते. हे सिस्टिम वीज बिल कमी करण्यासाठी वापरली जाते. ही सिस्टिम वापरण्यासाठी दिवसभर लाईट असणे गरजेचे आहे. जर लाईट नसेल तर ही सिस्टिम वीज निर्यात करू शकत नाही तसेच बॅटरी नसल्यामुळे साठवता तसेच वापरताही येत नाही. या सिस्टिम मध्ये बॅटरी नसल्यामुळे मेंटेनन्स खूप कमी असतो. शहरांमध्ये तसेच जेथे लोड शेडींग नाही अशा ठिकाणी ही सिस्टिम वापराने फायदेशीर ठरू शकते. यासाठी MSEB किंवा स्थानिक वीज वितरण कंपनीची परवानगी घ्यावी. जिथे commercial वीज मीटर आहे अशा व्यावसायिकांना MSEB ची वीज १० ते १३ रुपये प्रति युनिट ने विकत घ्यावी लागते. अशा व्यावसायिकांसाठी ही सोलर सिस्टिम खूप फायदेशीर ठरू शकते.
 १ किलो वॅट सोलर सिस्टिम सरासरी १२० युनिट प्रति महिना वीज तयार करते. तसेच खाली दिल्याप्रमाणे आपली वीज बिलामध्ये बचत होऊ शकते. १ किलोवॅट सोलर सिस्टिम मुळे वर्षभरात १ ते १.५ टन कार्बन पर्यावरणात येण्यापासून वाचतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होते. आपण जर रेसिडेन्शिअल ग्राहक असाल आणि आपले लाईट बिल RS ७०० ते ८०० येत असेल किंवा १२० पेक्षा जास्त युनिट प्रति महिना विजेचा वापर होत असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे.
आपण जर कमर्शिअल ग्राहक असाल आणि आपले वीज बिल ११०० ते १४०० येत असेल किंवा १२० युनिट पेक्षा जास्त विजेचा वापर असेल तर आपल्याला १ किलो वॅट सोलर सिस्टिम ची गरज आहे. आपल्या वीज बिलावर तसेच वर्षभरातील सरासरी विजेच्या वापर नुसार नेमका किती क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट लागणार आहे याची कल्पना येऊ शकते. आपली विजेची गरज, घराचे अथवा व्यवसायाचे ठिकाण, इमारतीचे छत, सावली , आपल्या एरिया मध्ये GRID ची उपलब्धता इ. चे सर्वेक्षण करून सोलर सिस्टिम ची साईझ ठरवावी लागते तसेच किंमत या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. सोलर सिस्टिम साठी घरगुती ग्राहकांना सरकार ने अनुदान (सबसिडी) देऊ केली आहे तसेच व्यावसायिकांना आयकरामध्ये मोठी सवलत देऊ केली आहे. यामुळे अशा सिस्टिम वापरण्यास चालना मिळत आहे. सोलर सिस्टिम बसवून घेताना त्याच्या किमतीकडे जास्त लक्ष न देता त्यामधील मालाचा दर्जा, गुणवत्ता, तसेच आपल्याला मिळणारी सेवा याचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले नुकसान होऊ शकते. आपली गरज नेमकी कोणत्या सिस्टिम ची आहे हे समजून घेणे गरजेचे आहे…
ज्यांना कोणाला सोलर संदर्भात काही शंका असतील तर कंमेंट मध्ये मला विचारू शकता. मी व माझी टीम आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू….!,
#मिळवा …!!
#आता विज बिलापासून मुक्तता …!!!
#सोलार ऑन ग्रिड सिस्टीम बसवा आणि विज बिलापासून मुक्त व्हा …
#कृष्णा एंटरप्राईझेस,
#अधिकृत वितरक – सर्व प्रकारच्या सोलार व वॉटर प्युरीफायर उत्पादने ..
#मेडेवार कॉम्पलेक्स, एकता चौक, नवीन मोंढा, नांदेड – महाराष्ट्र
#संपर्क – अल्ट्रा पॉवर सोल्युशन्स् ..!
#शर्मा – सोलार ॲडव्हाईझर..
मो. ८२०८६३८६१३,८९८३८९६४९२
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot