नांदेड – प्रतिनिधी
न्यूरो सर्जरी म्हणजे मेंदूच्या विविध विकारासंबधीच्या शस्त्रक्रिया त्यामध्ये मेंदूमध्ये वा मेंदूच्या आजूबाजूच्या ठिकाणी असलेले ट्यूमर, मेंदूतील रक्तवाहीन्यांवर तयार झालेले बलून्स व अपघातात झालेल्या इजा झालेल्या मेंदूवरील शस्त्रक्रिया आदींचा समावेश होतो या अंत्यत महत्वपूर्ण शल्यचिकित्सा विषयात नांदेडात डॉ. विवेक विश्वनाथराव शेटे यांचा अग्रक्रम असून गेल्या पाच वर्षांपासून नांदेडला ते न्यूरोसर्जन म्हणून लोकसेवा करीत आहेत . मराठवाड्यातच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रात जे हाताच्या बोटावर मोजता येतील, असे न्यूरोसर्जन आहेत त्यात डॉ. विवेक शेटे यांचा उल्लेख अपरिहार्य आहे .
आपल ध्येय समजत नसलेल्या वयात निष्ठेने ,कष्टाने आणि तडफेने ते पूर्ण करायच असे लोक फार क्वचितच आढळतात. डॉ. विवेक शेटे हे अशाच असामान्य आणि अपवादात्मक व्यक्तींपैकी आहेत. त्यांनी ईयत्ता १२ विला असतानाच ठरवले कि डॉक्टरच व्हायचं आणि या क्षेत्रातही न्यूरोसर्जन क्षेत्रातच डॉक्टर व्हायचं. एवढ परफेक्ट नियोजन करण आणि ते तितक्याच नियोजन बद्धरित्या पूर्णत्वास नेणं हि सोपी गोष्ट नाही .
त्यासाठी ध्येयाप्रत जाण्यासाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती आवश्यक असते आणि इतर कोणताही विचार न करता ध्येय गाठण्याची विजोगूशी वृत्ती आवश्यक असते . डॉ. विवेक शेटे यांनी आपल्या दुर्दम्य शक्तीच्या जोरावर ते करून दाखवलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण नांदेडातील नेहरू इंग्लिश स्कूल मध्ये झालं .
डॉक्टर होण्याचं वेड कदाचित या वयातच त्यांच्यात संचारलं असावं . ते असे सांगतात कि घरात उंदीर मेला तर तो बाहेर फेकून देण्या आधी बाळवयीन विवेक त्याची चिरफाड करायाचा आणि उंदराची अंतर्र्र रचना कशी असते हे जाणून घ्यायचा.
शरीर रचनेविषयी जाणून घेऊन बालवयातच त्यावर विचार करणारा मुलगा डॉक्टर न होणार तरच नवल . नांदेडच्या यशवंत कॉलेज मध्ये बारावी उत्तीर्ण करून विवेक शेटे यांनी सिईटी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण करून नवी मुंबई च्या एमजीएम मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस ची पदवी मिळवली आणि गुणवत्तेच्या जोरावर दिल्ली च्या एम्स ( ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स ) प्रतिष्ठेच्या महाविद्यालयात सहा वर्ष ज्ञान संपादन करून न्यूरोसर्जन हि उपाधी मिळविली .
विद्याथी असलेले विवेक शेटे हे डॉ. विवेक शेटे झाले तेंव्हा त्यांच्या विचारांना अधिक प्रगल्भता आली . एमजीएम कॉलेज मधून एम बी बी एस पदवी घेतल्या नंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षा दिली ती पण एक मुख्य उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते असे की मला जर न्युरो सर्जन व्हायचे तर ते पण फक्त एम्स् मधूनच आणि त्या आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी एम्स् साठीच्या पदव्युतर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परिक्षेत संपूर्ण देशातून त्यांनी ३४ वे मानांकन प्राप्त केले आणि त्यांना दिल्ली येथील एम्स् या देशातील अतिशय प्रगत आणि प्रतिष्ठित संस्थेत एमसीएस (न्यूरो सर्जरी )या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश मिळाला . आपली बुद्धिमत्ता पणाला लावून डॉ. विवेक शेटे यांनी ३ वर्षे समर्पित वृत्तीने अध्ययन करून एमसीएस (न्यूरो सर्जरी ) हि पदवी संपादन केली .
गेल्या पाच वर्षांपासून डॉ. विवेक शेटे हे डॉक्टर्स लेन मधील यशश्री हॉस्पिटल मध्ये मेंदू व मनका विकाराच्या रुग्णांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहेत. आता पर्यंत शेकडो मेंदू विकारग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी या रुग्णांना बरे केले आहे. कित्येक रुग्णांना तर त्यांनी मृत्यूच्या दारातून खेचून आणले आहे. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील वैशाली गर्थेवाड हि महिला ढाणकी येथे प्रसूत झाली. प्रसूती नंतर रक्तरस्त्राव जास्त झाल्यामुळे त्या कोमामध्ये गेल्या. नातेवाईकाकांनी इतर खाजगी दवाखान्यात उपचार केले पण काही कमी होईना अखेर वैशालीच्या नातेवाईकानी यशश्री हॉस्पीटल मध्ये दाखल केले, दाखल करतेवेळी वैशाली डिप कोमात गेली होती. वैशाली अत्यवस्थ होती त्यांच्या नातेवाईका जवळ पैसा नव्हता. डॉ. विवेक शेटे यांनी वैशाली ला पाहिले आणि लगेच ऑपरेशन टेबल वर घेतले. वैशाली च्या नातेवाईकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. इतर रुग्णालयात पैसे भरल्याशिवाय ऍडमिटच करून घेत नाहीत आणि यशश्री मध्ये पैशाची काहीही मागणी न करता डॉ. विवेक शेटे यांनी वैशालीला नुसते ऍडमिटच करून घेतले नाही तर, लगेच उपचारही सुरु केले सुमारे ४ तास यशस्वी शास्त्रक्रिया करून डॉ. विवेक शेटे यांनी वैशाली ला जीवन दान दिले, वैशाली चे नातेवाईक या विषयी सांगतात त्यावेळी त्यांचे डोळे कृतज्ञेते च्या अश्रुने भरून येतात.
डॉ. विवेक शेटे यांनी अनेकांवर अगदी मोफत उपचार केले. दर महिन्यास एका गरीब रुग्णावर ते मोफत ऊपचार करतात. याबद्दल त्यांचे काही सह व्यवसायी नाराजीही व्यक्त करतात, पण डॉ. विवेक शेटे म्हणतात कि काही झाले तरी मोफत उपचारांचा सिलसिला चालूच राहणार. गरिबांविषयची हि सेवावृत्ती म्हणजे डॉक्टरांना त्यांचे मामा बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्याकडून मिळालेला वारसाच आहे. डॉक्टरांची बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे .
त्यांच्या मते डॉक्टरी पेशा हे त्यांच्यासाठी पॅशन असून अनेकानेक गरजू रुग्णांवर कमीत कमी खर्चात उत्तमातील उत्तम सेवा देण्याकडे त्यांचा कल असतो व नांदेडात येणाऱ्या गरजू रुग्णांचा आकडा हा खूप मोठा असून त्याला कारण आपल्या कडे येणारा रुग्ण हा आजूबाजूच्या जिल्हयातून किंवा तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेला असतो त्यामुळे त्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळणे हे खूप गरजेचे आहे आणि ते देण्यासाठी एक डॉक्टर म्हणून मी कायम कटीबद्ध असेल अशी ग्वाही ते बोलतांना देतात तसेच रुग्णांनी पण आवश्यक उपचारासाठीच्या बाबी समजून घेत आम्हा डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याचे आव्हान ते आवर्जून करतात …
आपल्या व्यवसायात नियोजन आणि इतर सर्व काम पाहणारे आशुतोष भाले यांचा तर डॉक्टर मुद्दाम उल्लेख करतात. आशुतोषचे शिक्षण डॉक्टरांच्याच घरी झाले. आशुतोष हे डॉ. विवेक शेटे याना सावलीसारखी साथ देतात. आपल्या उपचारातून जास्तीत जास्त लोकांना व्याधीमुक्त करण्याचे डॉक्टरांचे ध्येय आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा …
सुचिंतक ,
मारोती सवंडकर , नांदेड
खूप छान लिखाण आहे सर, इमेज बिल्डिंग साठी अतिशय योग्य मार्ग आहे