#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन …!!

#आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…!!
#प्रशांत अण्णा तिडके पाटील हे अजातशत्रू व्यक्तिमत्व , दांडगा जनसंपर्क , हजारो युवकांची साथ असलेले अण्णा नावाने नांदेडकर युवकांमध्ये परिचित आहेत, पण आजच्या लोकप्रिय व्यक्तित्वामागे त्यांचा आजवरचा प्रवास हा प्रचंड कष्टा सोबत अनेक अडथळ्यांचा होता ही बाब निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख करावीच लागेल कारण नांदेड शहरालगतच्या छोट्या गावातून साधारणपणे २५-३० वर्षापूर्वी शहरात त्यांनी ठेवलेले पाऊल त्यांनतर शिक्षण, नौकरी, व्यवसाय आदी विविध काम करणारा एक सर्वसाधारण मुलगा, मोठेपणी अटकेपार झेंडा रोवून यशस्वी उद्योजक आणि प्रभावी नगरसेवक होतो. एवढेच नव्हे तर हजारो तरुणांना प्रेरणा देत नवी दिशा देतो, हे अशक्यप्राय वाटते; पण हे सत्य आहे.प्रशांत अण्णा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येते हे सिद्ध केले आहे.एवढेच नव्हे, तर अनेकांना त्यांनी यशाचा मार्ग दाखवला आहे.
आजच्या घडीला आपल्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगारासोबतच व्यावसायिक दृष्टीकोनातून सकारात्मक प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य ते आपल्या माध्यमातून करत आहेत या बळावरच प्रशांत अण्णा हे नुकत्याच पार पडलेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणारे युवा नगरसेवक ठरले आहेत .
अण्णांचा प्रवास निवडून येण्यापर्यंतच मर्यादित नाही हे त्यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकीर्दीतील सुरवातीच्या कालखंडातच दाखवून दिले आहे , सातत्याने संर्पकात राहणारा नगरसेवक तसेच समस्याचे आश्वासक निराकरण करण्याकडे त्यांचा असलेला प्रयत्न हे प्रभागातील नागरिकांसाठी मोठी समाधानाची बाब ठरली आहे.
यशानंतरही हुरळून न जाता ….. जनसामान्यांची नाळ कायम राखत …संयमी व शांततापूर्ण वाटचाल करणाऱ्या लाडक्या प्रशांत अण्णांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना आभाळभर शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा …….!
सदैव आपलाच ,
मारोती सवंडकर , नांदेड…!