#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन …
त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन ….
अत्यंत गरिबी, प्रतिकूल परिस्थिती, त्यातून पराकोटीच्या कष्टातूनच वाटचाल असे कर्मश्रेष्ठी व्यक्तित्व श्री राजेंद्र बंदखडके यांचे बालपण हे खूप म्हणजे खूपच कष्टप्रद होते ते बालपणीच एक आश्रीत विद्यार्थी, कमवा आणि शिका या पदपथावर अविरत मार्गक्रमण करत ते आज एक यशस्वी संस्थाचालक अशी ही आशादायी वाटचाल सर्वांनाच थक्कच नाही तर अचंबित करणारी वाटचाल करणाऱ्या राजेंद्र बंदखडके सरांच्या बंदखडके क्लासेस ची या स्पर्धात्मक क्षेत्रातील झेप ही थक्क करणारी आणि सामान्याला अभिमान वाटणारी अशीच आहे .
२०१० चा कालखंड, पुरेसे पाठबळ नाही, शिक्षण नाही. नांदेडात कोणीही परिचयाचे नाही तरीही आज मोठ्या यशस्वी क्लासेसचे निर्माते असणाऱ्या बंदखडके सरांच्या जीवनाचा आलेख यशस्वी दिशेने गेला. याचे कारण त्यांची दूरदृष्टी, जिद्द,चिकाटी, कष्ट करण्याची अपार तयारी, संयम,अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण आणि आव्हानांशी झगडण्याची क्षमता त्यासोबतच मुख्य म्हणजे आपल्याकडील असलेल्या शुन्य पाठबळाची सातत्यपूर्ण जाणीव ….. क्लासेसची सुरूवात अगदी होम ट्युशन्स पासून ……पुढे केवळ २० बाय ३० फुटांच्या जागेत एका छोट्याशा हॉलमधील प्रांरभचा खडतर काळ …अडथळे …. समस्या …. त्यावर यशस्वी मात …. ते आजचा छत्रपती चौक परिसरातील एक नावाजलेला कोचिंग क्लास म्हणजे बंदखडके क्लासेस …
प्रा. राजेंद्र बंदखडके आयुष्याकडे बघतांना नमूद करतात की ,
शिक्षण म्हणजे काय ? याचा विचार करताना…….
महात्मा फुले यांचं एक सूक्त मनावर बिंबलं गेलंय
अत्यंत मार्मिक, एक सूक्तीय उपनिषदच जणू !
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
एवढे सारे अनर्थ
एका अविद्येने केले...
विद्या नसल्यामुळे बुध्दी चालेना, बुध्दीचा उपयोग करता येईना. मति-बुध्दिहीनतेमुळे नीती गेली. नीतिमत्ता खालावली, व्यसनी-जुगारी-बाहेरख्यालीपणा वाढला. नीतीच्या कमतरतेमुळे गती खुंटली. गतीने प्रगती विकास होतो. माणूस उद्योग-व्यवसाय शोधतो, जगण्याचे मार्ग त्याला गवसतात ते गतीमुळे. गतीचा दुसरा अर्थ असा – ‘त्या क्षेत्रात विषयात त्याला गती नाही’ असं एखाद्या विषयात एखाद्याची प्रगती नसेल तर पूर्वी म्हटलं जाई. इथे गतीचा अर्थ कौशल्य, अभ्यास. जिथे गती नाही, तिथे पैसा कुठून येणार? गतीविना वित्त – पैसा गेला आणि वित्तसंपत्ती गेल्यामुळे ‘शूद्र’ खचले. हे सारे अनर्थ एका अविद्येने केले.
ही अविद्या काय आहे, हे मला खूप वर्ष कळत नसे. अविद्या म्हणजे कुविद्या असं मला वाटायचं. आणि या भितीपोटी प्रामाणिक कष्ट हाच उपाय असेल अशी धारण मनाशी पक्की करून मी धावतच राहीलो आणि ज्या ठिकाणी आहे तिथे समाधानाबरोबरच स्वतःला आनंदी समजतो असे ते मोठया आनंदाने मनापासून मान्य करतात त्याचवेळी ते याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त शिक्षणालाच देतात ……..
आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित त्यांना मनपूर्वक अभिष्टचिंतन आणि पुढील वाटचालीसाठी खूप-खूप सदिच्छा ….
आपला स्नेहांकित ,
मारोती सवंडकर , नांदेड …