March 9, 2021
#गणिताचे सोपे गणित म्हणजेच आर.बी.जाधव सर …!!

#गणिताचे सोपे गणित म्हणजेच आर.बी.जाधव सर …!!

#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन …!
#आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना अभिष्टचिंतन …

नांदेड – प्रतिनिधी

#नांदेडातील कोचिंग क्लासेस क्षेत्रासाठीचे महत्वपूर्ण योगदान असलेले त्यासोबतच सर्व क्लासेस धारकांना एकत्रित आणत पिटीए सारख्या महत्वपूर्ण संघटनेच्या स्थापनेपासूनच अग्रेसर राहत आजमितीला मराठवाडा विभागीय अध्यक्ष हे पद मोठ्या जबाबदारीने पेलणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून प्रा.आर.बी.जाधव सर ओळखले जातात .
#मोठ्या उमद्या मनाचा माणूस म्हणून सुपरिचित हाडाचे शिक्षक आर.बी. सर हे आपल्या जिंदादील कार्यशैलीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गणितासारख्या अवघड आणि किचकट समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दलही आवड निर्माण होते आणि गणित हा विषय आवडीचा व सहज सोपा वाटू लागतो असे चित्र त्यांच्या विद्यार्थ्यांशी सवांद साधल्यानंतर सहजपणे आपल्या लक्षात येते असे असले तरीही गणित म्हटले की आपल्यापुढे येतात धडकी भरविणाऱ्या बाबी म्हणजे , अबबबबबबब…
#गणिताचे धडे – त्याचा अनुक्रम. भूमिती, विभाज्यता, अवयव, लसावि, मसावि. अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, शेकडेवारी (टक्केवारी). बीजगणित, गुणोत्तर आणि प्रमाण, वर्ग, वर्गमूळ, घन, घातांक. सरळव्याज, चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, ऋण संख्या…अशा वळणावळणाच्या प्रश्नार्थक वाटा विद्यार्थ्यांनाच नाहीतर मोठ्यांनाही भाबांवून सोडणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या अशा दिसतात त्यामुळे आपसूकच गणिताबद्दलची भिती विद्यार्थ्यांच्या मनात कुठेतरी दडलेली असते ही बाब सर विद्यार्थ्यांशी झालेल्या पहील्या संवादातच अधोरेखित करतात
#त्याबळावरच आर. बी सर हे विद्यार्थ्यांसाठी गणिताचे सोपे गणित ठरले आहेत कारण त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीत लिलया मार्गदर्शन करतांना अध्ययनासोबतच मजेशीर बाबी अगदी सहजपणे जोडतात त्या म्हणजे गणितातल्या गंमती / युक्त्या, बालवाडी गणित, तोंडी गणित. चूक कुठे होते ? गणित हा विषय तुमचा नावडता आहे का ? गणिताची समीकरणे सोडवताना तुमच्या कपाळावर आठ्या येतात का ? गणित विषय कच्चा असल्यामुळे तुमच्या एकूण टक्केवारीत फरक पडेल यामुळे तुम्ही निराश झाले आहात का ?
या सर्व प्रश्नांची उत्तर ही अगदी सहजपणे उकल करत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला गणित विषय आवडीचा बनविण्यापर्यंत योगदान देणारे प्रा. आर. बी. जाधव सर सर्वश्रूत आहेत .
आज अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा ..!
सदैव आपलाच ,
#मारोती सवंडकर , नांदेड !
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot