February 27, 2021
ClBIL SCORE  काय असतंय ???

ClBIL SCORE  काय असतंय ???

हा टॉपीक अत्यंत कामी येऊ शकतो , जे नवीन नवीन मार्केटला येत आहेत .
बघा , आपण कित्येक ठिकाणी ऐकतो लोन घ्या , लोन घ्या  सिबील चांगला नसला तरी लोन मिळेल , फेकूचंद असतात हे , पण असो .
हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit)
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit)
या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .
पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .
जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट
आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये
Credit Information Bureau Ltd . या कंपनीची  स्थापना झाली .
आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .
आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे
समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला .
तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .
आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?

जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़.
CIBIL स्कोर हा
300 ते 900
मध्ये मोजला जातो .
जर आपला स्कोर 675 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल .
पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा
कर्ज मिळतच नाही
म्हणजे समजलं !
कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ?
तर CIBIL Score नीट नसतो .
CIBIL Score कमी का होतो ?
1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे .
2) कर्जाची परतफेडच न करणे .
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे .
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .
बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते .
याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना मूर्ख बनवू शकत नाही . ( आता काही जण मल्ल्याचं नाव घेऊन , उलट सुलट चर्चा करतील , पण तशा केसेस वेगळ्या असतात ) .
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते .
तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL score सुधारेल ?
1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका .
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )
3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .
5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही .
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .
CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते .

या मध्ये
NA – No Activity
NH – No History

असे पर्याय दिसू शकतात .
तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा  , अशा प्रकारे  CIBIL मध्ये आपली History तयार होईल .
बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही , आपण बँकांना , त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का  देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो .
बँकेसमोर बँड वाजवतो , आंदोलनं करतो , धरणे देतो .
पण राजे हो , कर्ज मिळण्या पाठीमागे
एवढा सगळा पसारा असतो .
इथे सबकुछ CIBIL असतं .
त्याच्या  बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही .
म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज ,
बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा !
नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही

आपल्या बँक कर्जे व आर्थिक सहाय्या संबधी प्रश्‍नांसाठी एकदा अवश्‍य संपर्क करा ..

अरविंद पाटील ,

लोन पाँईट , कोठारी कॉम्पेलेक्स, शिवाजीनगर, नांदेड

९५४५५५९९९

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot